मोहोळ (प्रतिनिधी) -- मोहोळ नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ४४ कोटी ६८ लाखाचा निधी मंजूर आमदार यशवंत (तात्या)माने यांनी दिली माहिती.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विशेष सहकार्याने व माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार यशवंत (तात्या)माने यांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे मोहोळ नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ४४ कोटी ६८ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.
आगामी काळात मोहोळ शहरवासीयांची पाण्याची होत असलेली भटकंती कायमस्वरूपी थांबणार आहे. या कार्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व मोहोळचे रहिवासी असलेले नगर विकास विभागाचे उपसचिव आंडगे यांचे देखील विशेष सहकार्य लाभले आहे.
आमदार यशवंत (तात्या)माने यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व नगरविकास विभागांचे उपसचिव आंडगे साहेब यांचे विशेष आभार मतदारसंघाच्या वतीने मानले आहेत.