रांजणीत किशोरी हितगुज मेळावा

0
 'ती'च्या स्वप्नांना साकार करण्यासाठी,ती'च्या पंखांना बळ देण्यासाठी संकल्पबद्ध होऊया..
’ती'ला सक्षम करूया….

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त तिच्या चिमुकल्या पंखांना उडण्याचं बळ देत, तिच्या सक्षमीकरणाचा निर्धार करूया!
 -महिला नेत्या सौ.अंजलीताई समाधान आवताडे.
          पंढरपूर (प्रतिनिधी) - आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिनाच्या औचित्य साधत पंढरपूर  तालुक्यातील इयत्ता ५वी ते ७ वी पर्यंतच्या मुलींचा "*किशोरी हितगुज मेळावा*" रांझणी येथे आयोजित करण्यात आला होता ।
       या मेळाव्याच्या अध्यक्षा म्हणून महिला नेत्या सौ.अंजलीताई आवताडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या फोटोस हार घालत विनम्र अभिवादन केले आणि   "मुलींच्या शिक्षणातील संधी व कायद्याचे सरंक्षण" तसेच सक्षमीकरणावरती विषयावर आपले शब्द मांडले, किशोरीं समवेत हितगुज साधले.
    
       जगण्याचा व शिक्षणाचा समान अधिकार व संधी या आजच्या बालिकांना दिली तर उद्याच्या कर्तृत्ववान स्त्रिया भारताला लाभतील तसेच शिकतील आणि सक्षम होतील, मुली जगाचे भविष्य घडवतील हा विचार व्यक्त करत 
ती'च्या चेहऱ्यावरचे हास्य आणि डोळ्यातलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी कार्यरत राहणं आपलं कर्तव्य आहे हे आवाहन देखील महिला नेत्या सौ.अंजलीताई आवताडे यांनी यावेळी केले. विट्ठल रखुमाई प्रत्येक लेकीला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ देवो ही प्रार्थना करत,या निरागस डोळ्यांतील हास्य आणि स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करत तो सिद्ध करण्याचे आवाहन करत, अखंड चैतन्याचा झरा असलेल्या सर्व बालिकांना राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी सौ.सीमाताई प्रशांत परिचारक मॅडम, जि. प.स.श्री.वसंत नाना देशमुख, श्री.पंडितराव भोसले साहेब, गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडेसाहेब, सरपंच सौ.स्वातीताई श्रीमंत दांडगे  मॅडम,व्यवस्थापन अध्यक्ष मॅडम स्वप्नाली सिताराम दांडगे,उपाध्यक्ष मॅडम संगीता विठ्ठल दांडगे , मुख्याध्यापक खूळपे  मॅडम,चेअरमन श्री.भारत दांडगे,उपसरपंच मारुती भाकरे,साहेबराव ढोले,महादेव ढोले, ,कीसन भुताडे, कुंडलिक सुरवसे, हेमंत दांडगे,सिताराम दांडगे ,महादेव सप्ताळ, आनंद कांबळे, दिगंबर मोरे,गणेश घाडगे, बापू दांडगे, बंडू शिंदे,महादेव घाडगे, ,धनाजी पवार, बिबीशन बोरगावे, अभिजीत माने, योगेश दांडगे, अशोक घोडके, अकबर मुलानी, विठ्ठल दांडगे, दादासो घायाळ ,आनंद कांबळे,गणेश पंडित, समाधान सप्ताळ, लक्ष्मण गांडुळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व व्यवस्थापन सदस्य व ग्रामस्थ किशोरवयीन मुली तसेच शिक्षक शिक्षकेतर  कर्मचारी वृंद आणि प्रतिष्ठित नागरीक पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)