नीरा नरसिंहपूर ता. इंदापूर -(प्रतिनिधी) - येथील- श्रीलक्ष्मी-नृसिंह मंदिरामध्ये मकर संक्रांतीच्या पर्वकाळात सौभाग्याचे लेणे लुटण्यासाठी माढा, इंदापूर, माळशिरस, बारामती, करमाळा, पंढरपूर व सोलापूर व पुणे जिल्हा येथून अनेक महिलांनी यावर्षी दळणवळणाची सोय झाल्यामुळे शेवरे- नरसिंगपूर व संगम- नरसिंगपूर या पुलावरून महिलांची चांगली सोय झाल्याने टेम्पो; जीप; टू-व्हीलर; बैलगाडी; रिक्षा; आणि स्वतःची खाजगी वाहने यांनी अनेक महिला येत होत्या.
श्रीलक्ष्मी नरसिंह मंदिरात ओवसण्यासाठी व सौभाग्याचे लेणे लुटण्यासाठी, हळदीकुंकवासाठी, मंदिरामधील बिडकर ओवरी,.. पश्चिम दरवाजा ओवरी,.. उत्तर दरवाजा,. भीमाशंकर बारगजी,. लक्ष्मी मंदिर बारगजी,.. पूर्व महाद्वार, भैरवनाथ बारगजी,. या ठिकाणी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. यावर्षी पर्वकाळ सूर्योदय ते सूर्यास्त असल्याकारणाने दिवसभर महिलांचे गर्दी होत होती. लहान मुले महिला यांची प्रचंड गर्दी होती.
निरानरसिंहपुरला ही सर्वात मोठी महायात्रा असते. लहान मुलांसाठी पाळणे, झोके, स्टेशनरी दुकाने, आगगाडी रेल्वे, खेळणी, खाद्य पदार्थाचे स्टॉल, तिळगुळ विक्रीची दुकाने, फिरते हॉटेल्स, फुगेवाला, बांगडीवाला, बॅगा, घर संसाराची दुकाने थाटली होती. तसेच यावर्षी प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल या माध्यमातून झाली आहे. सर्व महिलांनी मिळून तिळगुळ वाटप करणे, हळदीकुंकवाचा वसा घेणे. ओवाळणे, सौभाग्य लेणे लुटणे,.विडे घेणे,. इत्यादी कार्यक्रम मंदिरामध्ये केले.
लक्ष्मी नरसिंह देवस्थानच्या वतीने सर्व व्यवस्था चांगली ठेवली होती. पोलीस बंदोबस्त फार चोख होता. एवढी प्रचंड गर्दी असून सुद्धा पोलीस बंधू आणि भगिनींनी मंगळसुत्र, चोरी होणे, लहान मुले हरवणे , भांडण तंटा होणे,.इतर वस्तू हरवणे,. याबाबत जागृत राहून बदोबस्त ठेवला होता,.. देवस्थानच्या ऑफिसमधून स्पीकरवर वारंवार सूचना दिल्या गेल्यामुळे गर्दी आटोक्यात ठेवण्यात आली,. बावडा दुरक्षेत्र मंडळातील पोलीस कॉन्स्टेबल नामदेव मोरे, निमगिरी मॅडम, इंगोले मॅडम, ए पी आय जाधव साहेब, गोसावी साहेब, घुले मॅडम यांनी मंदिरात व मंदिराच्या बाहेर चौकात पोलीस बंदोबस्त ठेवला. पश्चिम दरवाजा ते चौक, पूर्व दरवाजा ते सुळखांबा,. उत्तर दरवाजा ते शेवरे पूल,.चौक ते आडोबा वस्ती या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती ती सर्व गर्दी पोलीस बंधू-भगिनींनी नियंत्रणात ठेवली,. पोलीस व्हॅन वारंवार सुचना देत होती,.. लक्ष्मी नरसिंह देवस्थानच्या वतीने सर्व पोलिसांचा सन्मान करण्यात आला,. तसेच देवस्थानच्या लक्ष्मी नृसिंह देवस्थानच्या वतीने व्यवस्थापक अविनाश दंडवते भाऊसाहेब,.. व्यवस्थापक सागर काकडे, पुजारी मंडळ - प्रसादभैय्या दंडवते, गौरव दंडवते, ग्रामपंचायत निरानरसिंहपूरच्या वतीने सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे व तंटामुक्तचे अध्यक्ष दशरथ राऊत उपसरपंच गुरूदत्त गोसावी सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आणि यावर्षीचा मकर संक्रांतीचा सोहळा थाटामाटामध्ये व प्रचंड महिलांच्या गर्दीने संपन्न झाला.