श्री. सुहास अशोक राऊत सर यांना इंदापूर तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार

0
            निरानरसिंहपुर ता. इंदापूर (प्रतिनिधी) - येथील चैतन्य विद्यालय व श्री.सु.गो.दंडवते कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व गणित विषयाचे गाढे अभ्यासक श्री. सुहास अशोक राऊत यांना इंदापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, इंदापूर यांच्यावतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
         या पुरस्कार सोहळ्यासाठी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. विजयकुमार परीट साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. अजिंक्य खरात साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती इंदापूर तसेच पुणे जिल्हा मुख्याध्यापक शाळा संघाचे अध्यक्ष श्री. नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड, उपाध्यक्ष रामराव पाटोळे, इंदापूर तालुका मुख्याध्यापक शाळा संघाचे अध्यक्ष श्री गणेश घोरपडे व इंदापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री जगन्नाथ पाटील यांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले.
         सुहास अशोक राऊत सर हे जेष्ठ शिक्षक असून गेले सत्तावीस वर्ष गणित विषयाचे अध्यापन करीत आहेत. ते एम एस सी एम एड असून गणित विषयाचे तज्ञ शिक्षक म्हणून त्यांनी तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये शैक्षणिक कार्य केले आहे. इयत्ता दहावी चा सतत ssc बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागत आहे . त्यांना संगणकाचे ज्ञान चांगले आहे. ए एल पी इयत्ता नववीचे तज्ञ गणित विषय शिक्षक म्हणून सेवा अंतर्गत प्रशिक्षणात सहभाग घेतला आहे. ते एनटीएस, एमटीएस, स्कॉलरशिपचे मार्गदर्शक म्हणून कार्य करत आहेत. त्यांचे शैक्षणिक कार्य फार चांगले आहे. ते हुशार, प्रामाणिक व शांत संयमी स्वभावाचे आहेत.
       हा गुणवंत पुरस्कार सोहळा श्री. बाबीर विद्यालय रुई येथे पार पडला. श्री. राऊत यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष श्री डॉ.प्रशांत सुरू, कार्याध्यक्ष अभय वांकर पाटील, कार्यवाह श्रीकांत दंडवते पाटील, खजिनदार मगनशेठ क्षीरसागर ,ज्येष्ठ सदस्य व मार्गदर्शक प्रकाश सुरू सर, सदस्य  व माजी मुख्याध्यापक धनंजय दुनाखे सर, प्रमोद दंडवते, अमोल कोरंटक, मुख्याध्यापक गोरख लोखंडे सर, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी वर्ग सर्व सभासद व पालक यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)