उज्वल भारत लौकिक पुणे यांचा सन 2023 चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
पुणे (प्रतिनिधी) -- अलिबाग येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदिवासी सेवक, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ, जेष्ठ पत्रकार डॉ. जयपाल पाटील यांना सन 2023 चा उज्वल भारत लौकिक पुरस्कार संस्थेचे संस्थापक संपादक संजय जोशी यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
येत्या 1 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त रायगड येथे एका विशेष समारंभात डॉ.जयपाल पाटील यांना कृषी भूषण डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांच्याहस्ते प्रदान करण्यात येणार असून केंद्रीय रस्ते विकास व इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मंत्री. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. श्री. संजय जोशी हे पत्रकारिता, सामाजिक, आरोग्य सेवा क्षेत्रात गेली 40 वर्ष त्यांचे योगदान असून सीनियर जर्नालिस्ट असोसिएशन ट्रस्ट, मराठी मायबोली ट्रस्टचे, संस्थापक सचिव आणि एक्स्ट्रीम न्यूज इंडिया कॉम. एक्स्ट्रीम टुडे कॉम. या जागतिक पातळीवर सोशल मीडिया माध्यमातून, गुगल, फेसबुक, इन्स्टा, व्हाट्सअप व्यासपीठावर गेल्या अनेक वर्ष कार्यरत आहेत. त्यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे.
डॉ. जयपाल पाटील यांनी गेली 25 ते 30 वर्ष दिव्यांग, अल्पसंख्यांक, आदिवासी क्षेत्रात विलक्षण कार्य केले व करीत आहेत. ते सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रणी असून संघटन कौशल्याचे प्रणेते आहेत. त्याचबरोबर विविध संस्थांचे सदस्य सल्लागार महाराष्ट्र शासनाचे कृषी मित्र, प्राणिमित्र, आपदा प्रशिक्षक आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक प्राचार्य, महाराष्ट्र पोलीस, कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, पत्रकार, संपादक, वन कर्मचारी, डाॅक्टर, परीचारीका, वकील कामगार, लाखो जनतेला आपत्ती सुरक्षा विषयक प्रशिक्षण दिले आहेत व देत आहेत.आता पर्यंत 530 प्रत्यक्ष व्याख्याने. व आकाशवाणी मुंबई, शेतकऱ्यांसाठी, रत्नागिरी, युवक-युवतीसाठी, कोल्हापूर, ज्येष्ठ नागरिकांसाठी, सोलापूर, कामगारासाठी आणि पुणे येथून, महिलांसाठी व्याखाने दिली आहेत. कृषी क्षेत्रात त्यांचे योगदान महत्वपूर्ण असल्याने त्याची सन 2023 चा संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर केल्याची माहिती श्री. संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिलीआहे.