गतवर्षीच्या उत्पन्नापेक्षा यावर्षी 23 लक्ष रुपयांची वाढ - कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र शेळके
पंढरपूर (ता.28)- माघ यात्रा ही माघ महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपूरात साजरी केली जाते. सन 2024 यावर्षी माघ एकादशी मंगळवार, दि.20/02/2024 रोजी संपन्न झाली. त्याचा कालावधी माघ शुद्ध 01 ते (दि.10/02/2024) ते माघ शुद्ध 15 (दि.26/02/2024) असा होता.
या यात्रा कालावधीत मंदिर समितीस विविध मार्गातून 3,50,22,519 रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी 4,88,68,028 इतके उत्पन्न मिळाले होते. गतवर्षी सोने व चांदी भेट वस्तू उत्पन्न 1,66,6,146 रुपये इतके होते. यावर्षी सोने व चांदी भेट वस्तू 5,15,805 एवढे किंमतीचे जमा झाले आहे. त्यामुळे सोने व चांदीचे उत्पन्न वगळता गतवर्षीच्या उत्पन्नापेक्षा 23,06,152 इतके जास्त उत्पन्न झाल्याचे कार्यकारी अधिकारी श्री. राजेन्द्र शेळके यांनी सांगितले.