मा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सूचनेनुसार त्वरित एसटी बस सेवा सुरू
निरानरसिंहपूर ता. इंदापूर (प्रतिनिधी) - श्रीक्षेत्र निरानरसिंहपूर येथील श्रीलक्ष्मी नरसिंह मंदिरात दर्शनासाठी व पुजेसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते पाटील आले होते. यावेळी त्यांनी श्रीनृसिंह देवतेस पुजा व आरती केली. पौरोहित्य आल्हाद काका दंडवते यांनी केले. याप्रसंगी लक्ष्मी नृसिंह देवस्थानच्या वतीने व्यवस्थापक अविनाश दंडवते भाऊसाहेब यांनी "श्री" चा प्रसाद, शाल, श्रीफळ, पुष्पहार, देऊन दादांचा सत्कार केला. तसेच ग्रामपंचायत निरानरसिंहपूर यांचे वतीने सरपंच प्रतिनिधी नितीनराव सरवदे यांनी दादांचा फेटा व पुष्पहार देऊन सत्कार केला.
यावेळी लक्ष्मी नृसिंह देवस्थान कडून श्रीलक्ष्मी नृसिंहच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविक भक्ताकरीता अकलूज टेंभुर्णी वरून निरानरसिंहपुर करिता बस चालू करण्यात यावी असे लेखी निवेदन देण्यात आले. आदरणीय दादांनी नृसिंह मंदिरातूनच विभागीय नियंत्रक परिवहन मंडळ सोलापूर व अकलूज आगार यांच्या प्रमुखाशी फोन करून संपर्क साधला व निरा नरसिंगपूर मार्गे बस सेवा सुरू करण्यात यावी अशा सूचना केल्या. लगेच विभागीय नियंत्रक परिवहन मंडळ सोलापूर यांनी ताबडतोब अकलूज आगार यांना लेखी पत्र देऊन निरानरसिंहपूर मार्गे चार बस चालू करण्यात यावे असे आदेश दिले. तसेच विभागीय नियंत्रण सोलापूर यांनी तसे लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टला पत्रही दिले. खालील प्रमाणे बस सेवा निरानरसिंगपूर मार्गे चालू झालेली आहे-
१) टेंभुर्णी -अकलूज स.६:०० वा.
२) अकलूज -टेंभुर्णी स.१०:१५ वा.
३) अकलुज-टेंभुर्णी दु.२:०० वा.
.४)अकलुज-टेंभुर्णी सायं ४:०० वा.
अशा एकूण चार फेऱ्या निरानरसिंहपूर मार्गे बस सेवा या चालू होतील हे कळवले. याप्रसंगी संगम व निरानरसिंगपूरचे सर्व राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्रीलक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील उर्फ दादा व विभागीय नियंत्रक परिमंडळ सोलापूर व अकलूज आगार यांचे मनःपूर्वक आभार मानले. सुत्रसंचालन व मा.दादांच्या राजकीय,.. सामाजिक,..धार्मिक,..कार्यांचा आढावा धनंजय दुनाखे सर यांनी केला !