श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू

0
       प्रतिवर्षाप्रमाणे वसंत पंचमीला श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा - गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

           पंढरपूर दि.12 (प्रतिनिधी) - प्रतिवर्षीप्रमाणे श्रीविठ्ठल रूक्मिणीमातेचा विवाह सोहळा माघ शुध्द 01 (10/02/2024) ते माघ शुध्द 05 (14/02/2024) या कालावधीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून, त्याची जय्यत तयारी मंदिर समितीने केल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

       यानिमित्ताने, श्री विठ्ठल सभामंडप येथे दुपारी 04.00 ते 06.00 या वेळेत श्री रूक्मिणी स्वयंवर कथेचे निरूपण श्रीमद् भागवताचार्य कु.साध्वी अनुराधा दिदी यांचे सुमधूर व रसाळ वाणीतून सुरू आहे. 

          वसंत पंचमी दिवशी सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत श्रींचा विवाह सोहळा संपन्न होत असून, मंदिरात आकर्षक पद्धतीची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यादिवशी परंपरेनुसार श्रीस अलंकार परिधान करणे, मंदिरात फुलाची आरास, अन्नछत्रांमध्ये विशेष भोजन प्रसादाची सोय व सदर सोहळा भाविकांना लाईव्ह पाहता यावा, यासाठी मंदिर परिसरात एलईडी स्क्रीन, मंदिर समितीचे अधिकृत संकेतस्थळ, युट्युब व फेसबुक यासारख्या समाज माध्यमाद्वारे लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येणार असल्याने सदरचा  सोहळा भाविकांना घरबसल्या पाहता येणार आहे, त्याची लिंक खाली दिलेली आहे. 

       याशिवाय, सायं. 05.00 वा. नगरप्रदक्षिणामार्गाने श्रींच्या प्रतिकात्मक मूर्तींची सवाद्य मिरवणूक /शोभायात्रा काढण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

संकेतस्थळ
https://vitthalrukminimandir.org/

फेसबुक
https://www.facebook.com/vitthalrukminimandiresamiti?mibextid=2JQ9oc

यू ट्यूब
https://youtube.com/@livedarshanshrivitthalrukm9339?feature=shared

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)