माजी सैनिक व सैनिक यांना श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेचे जलद दर्शन

0
 

           श्रीक्षेत्र पंढरपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीत येत असतात. तसे पाहता पंढरीत भाविकांची गर्दी कायमच असते. त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या भाविक भक्तांना दर्शनास फार उशीर होतो. आलेल्या भावीक भक्तांमध्ये अनेक हुद्यांवर काम करणारे भाविक भक्त देखील असतात. दर्शनास उशीर लागल्याने त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करावे लागतात. 
       काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हा माजी सैनिक संघटनेच्या वतीने श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या माजी सैनिक व सैनिक यांना जलद दर्शन मिळावे असे पत्र निवेदनाद्वारे देण्यात आले होते.  त्या पत्राला मंदिर समिती कडून मान्यता देण्यात आली आहे.
        जे माजी सैनिक व सैनिक श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाला येतात त्यांनी आपले आयडेंटिटी कार्ड सोबत आणावें व तेथील मंदिर प्रशासनाला कार्ड दाखवल्यावर आपल्याला सरळ दर्शनाचा लाभ घेता येईल असे मंदिर समितीचे व्यवस्थापक यांनी लेखी पत्राद्वारे संघटनेस कळवले आहे.
        तरी सर्व माजी सैनिकांना विनंती आहे की, पंढरीत गेल्यावर कोणताही वादविवाद न करता सामोपचाराने कार्ड दाखवून दर्शनाचा लाभ घ्यावा. यासाठी सोलापूर जिल्हा माजी सैनिक संघटनेच्या वतीने तसे पत्र देण्यात आले आहे. सैनिकांच्या होणाऱ्या अडचणी घेऊन हे कार्य केले आहे सोडवण्यासाठी कॅप्टन दिलावर शेख साहेब व संघटनेचे अध्यक्ष अरुण कुमार तळीखेडे यांनी परिश्रम करून व स्वतः भेट देऊन हे कार्य केले.
        माजी सैनिक व सैनिक यांना श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेचे जलद दर्शनाचा निर्णय घेतला त्याबद्दल  मंदिर समितीचे भारतीय माझे सैनिक संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)