‘एमबीए व एमसीए च्या सीईटी २०२४’ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ

0
स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

           पंढरपूर (प्रतिनिधी) – शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमबीए व एमसीए प्रवेशाकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सीईटी २०२४ या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ मिळाली आहे. प्रशासनाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून नवीन वेळापत्रकानुसार  एमबीए व एमसीए या दोन्ही कोर्सेस साठीच्या सीईटी- २०२४ या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया मंगळवार, दि.०६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. पदवी उत्तीर्ण झालेल्या व पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमएएच एमबीए-सीईटी २०२४ व एमएएच एमसीए-सीईटी २०२४ साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा स्वेरीतील एमबीए व एमसीए या विभागात उपलब्ध करण्यात आली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
         पदव्युत्तर पदवी असलेल्या एमबीएच्या प्रवेशाकरीता अत्यंत महत्वपूर्ण समजली जाणारी एमएएच-एमबीए-सीईटी २०२४ ही परीक्षा शासनाच्या दिलेल्या वेळापत्रकानुसार साधारण ९/१० मार्च या दोन दिवशी होणार आहे. तर एमएएच-एमसीए-सीईटी २०२४ ही परीक्षा साधारण दि.१४ मार्च २०२४ च्या दरम्यान होणार आहे. एकूणच एमबीए व एमसीएच्या या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.११ जानेवारी २०२४ पासून ते गुरुवार, दि.०१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत चालणार होती परंतु विद्यार्थ्यांना संबंधित कागदपत्रे व प्रमाणपत्रे मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थी या एमबीए व एमसीएच्या –सीईटी पासून वंचित राहू नये यासाठी याला मुदतवाढ दिली आहे. आता एमबीए व एमसीए या दोन्ही पदव्युत्तर पदवीच्या प्रवेशाकरिता मंगळवार, दि.०६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या प्रवेश परीक्षेच्या संदर्भात अधिक माहीतीसाठी शासनाच्या https://mbacet2023.mahacet.org या संकेत स्थळावर तसेच स्वेरी अभियांत्रिकीच्या एमबीएचे विभागप्रमुख प्रा.करण पाटील (मोबा. नंबर–९५९५९२११५४) व एमसीएचे विभागप्रमुख प्रा.मनसब शेख (९०२८९०७३६७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)