मंगळवेढा (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी वृषाली पांडुरंग इंगळे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्षा सोनाली अजित गाडे यांनी केली असून सदर नियुक्तीचे पत्र शनिवारी त्यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने वृषाली इंगळे यांची नियक्ता करण्यात आली असून यापदाच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी व पदाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावीत असे प्रदेशाध्यक्षा सोनाली गाडे यांनी त्या नियुक्ती पत्रामध्ये नमूद केले आहे.