पौष वारीस प्रशासन पूर्णतः सज्ज !
श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर जि. नाशिक (प्रतिनिधी) - मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व खा. डॉ. श्रीकांतदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाने, नाशिक पालकमंत्री दादाजी भुसे व शिवसेना सचिव भाऊसाहेबजी चौधरी यांच्याशी चर्चा करुन त्र्यंबकवारी नियोजीत कामाची प्राथमिक आढावा बैठक घेतली.
संत श्री निवृत्तीनाथमहाराज समाधी संस्थान पौष वारीस एकूण भाविक संख्या ७ ते ८ लक्षहून अधिक भाविक असतात.
वारी विशेष बाब म्हणून काही निधी उपलब्ध व्हावा व त्यातून थेट भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हावेत. नाशिक जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव देण्याबाबत मंदिर समितीला कळविले असून त्यातून संपूर्ण दर्शन बारी व इतर मुख्य व्यवस्था भाविकांकरीता करण्यात येणार आहेत. याकरिता नाशिक जिल्हा प्रशासनाला निरोप तसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत . यावेळी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी मा.जिल्हाधिकारी सो. यांच्याशी संबंधित कामाविषयी बोलणं देखील झाले आहे.
• संत निवृत्तीनाथ संस्थांच्या मागणीनुसार आतरिक्त पोलीस बंदोबस्ताबाबत मा. पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करता क्षणी आतरिक्त ३०० पोलिसांचा बंदोबस्त मंदिर परिसर व दर्शन बारीत वाढविण्यात आला आहे.
• मुख्यमंत्री महोदयांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा वारी पूर्व नियोजन आढावा घेत सर्व शासकीय यंत्रणांना अधिक सज्ज कराव्यात अशी विनंती बैठकी नंतर मा. मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना आम्ही केली आहे. मला खात्री आहे की साहेब आजच तशी बैठक घेतील.
• पंढरपूरप्रमाणे शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना म्हणून सहाशे दिंडी प्रमुखांचा सन्मान व मुख्यमंत्री श्रीएकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून अध्यात्मिक क्षेत्रासाठी झालेले कार्याचे माहिती पत्रक.
• वारकऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी
• मंदिर स्वच्छता अभियान.
• भक्ती शक्ती संवाद व भव्य कीर्तनकार संत सम्मेलन.
यावेळी लोकसभा संपर्क प्रमुख सुनीलजी पाटील, जयंतजी साठे, सह संपर्क प्रमुख राजेंद्रजी सोनावणे, जिल्हाप्रमुख अनिलजी ढिकले, संत निवृत्तीनाथ संस्थान अध्यक्ष तथा शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना सहअध्यक्ष श्री. निलेशजी गाढवे व समस्त विश्वस्त व त्र्यंबकेश्वर नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचके उपस्थित होत्या.