शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी फडकविला अमरावतीत विजयी झेंडा

0
चि. पवन संजय प्रक्षाळे याने पटकाविला प्रथम क्रमांक

          पंढरपूर (प्रतिनिधी) - राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था नॉफ अमरावती येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ब्रेल वाचन, सुगम गायन स्पर्धेमध्ये वरिष्ट गट इयत्ता 8 वी ते 12 वी या मराठी ब्रेल वाचन स्पर्धेत लायन्स क्लब पंढरपूर यांची शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा पंढरपूर या शाळेचा विद्यार्थी चि.पवन संजय प्रक्षाळे याने प्रथम क्रमांक पटकावला.
          सदरच्या अमरावती स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थिनी सुवर्णा प्रभाकर गायकवाड व ऐश्वर्या राजेंद्र एडके यांनीही सहभाग घेतला होता. त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. संगीता महापात्रा यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पारितोषिक देण्यात आले.
         या प्रसंगी अमरावती जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. राजेंद्र जाधवर साहेब यांनी विशेष कौतुक केले. याकरिता विशेष शिक्षक व मुख्याध्यापक संतोष  बाराहाते सर आणि श्रीमती शोभा घाटे यांनी परिश्रम घेतले.
        विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री. मुन्नागीर गोसावी साहेब यांनी कौतुक केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)