पंढरपूर (प्रतिनिधी) - इंटर इंजी. डिप्लोमा स्टुडंटस्पोर्ट असोसिएशन द्वारा मैदानी स्पर्धा दि. 9 फेब्रुवारी रोजी कर्मयोगी पॉलिटेक्निकच्या ग्राउंडवर पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन पॉलिटेक्निक कॉलेजचे इलेक्ट्रॉनिक आणि टेलीकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख प्रा. राजेश खिस्ते यांचे हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी विविध कॉलेजचे टिम मॅनेजर तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. या मैदानी स्पर्धेसाठी १० कॉलेजमधून १५० हून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेमध्ये भालाफेक मध्ये कर्मयोगीचा सचिन कदम याने प्रथम क्रमांक मिळविला, १५०० मी. रनिंगमध्ये संकेत पिसे यांनी द्वितीय क्रमांक, तर कर्मयोगी कॉलेजच्या रिले टिमने उपविजेता पद मिळवले. त्यामध्ये सुशांत साळुंखे, संकेत पिसे, सचिन कदम, प्रेम धांडे यांनी सहभाग नोंदवला.
दि. 2 फेब्रुवारी रोजी शा. तं. कॉलेज सोलापूर येथे झालेल्या खो-खो स्पर्धेमध्ये शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या संघावर एक डाव चार गुणांनी विजय संपादन केला. या संघामध्ये राम ढोबळे, रितेश पाटील, रुपेश पाटील, सिद्धनाथ जवळेकर, शिवदत्त साळुंखे, ओमराज खेडेकर, चैतन्य वाघ, चैतन्य कदम, प्रवीण उपाशे, ओम उपाशे, प्रेम धांडे, श्रीराम कुलकर्णी, गौरव खेडेकर, कृष्णा मोरे, प्रफुल पवार या सर्व खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत विजय संपादन केला. गारगोटी येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे. या मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा. रोहन मालक परिचारक तसेच पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ.ए.बी.कणसे, कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ एस पी पाटील, रजिस्ट्रार श्री. गणेश वाळके यांनी अभिनंदन केले. सदरच्या क्रिडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन क्रीडा संचालक बी. जे. साळुंखे यांनी केले. सर्वांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.