ला.प्रा.धनाजी चव्हाण आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब एक्सलन्सने सन्मानित

0
          सांगोला (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना प्रांत ३२३४ड१ रिजन एक झोन पाचचे झोन चेअरमन, लायन्स क्लब ऑफ सांगोला सन २०२१-२२ व २०२२-२३ अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण यांचा आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब एक्सलन्स अवार्डने सोलापूर येथे संपन्न झालेल्या विभागीय परिषदेमध्ये  विभागीय परिषद सभापती ला.अशोक मेहता यांचे हस्ते लायन्स इंटरनॅशनलकडून प्राप्त आंतरराष्ट्रीय क्लब एक्सलन्स पिन व क्लब एक्सलन्स सन २०२२-२३ असा बॅनर पॅच प्रदान करून सन्मान करण्यात आला.याचा स्विकार करताना सांगोला लायन्स क्लब सन २०२२-२३ सचिव व विद्यमान अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर उपस्थित होते.
      यावेळी व्यासपीठावर प्रांत ३२३४ड१ प्रांतपाल ला.भोजराज नाईक - निंबाळकर प्रथम उपप्रांतपाल ला.ॲड एम.के.पाटील  द्वितीय उपप्रांतपाल ला.डॉ.विरेंद्र चिखले , विभागीय सभापती  ला.राजेंद्र शहा, माजी प्रांतपाल ला.राजशेखर कापसे, विभागीय सचिव ला.गोविंदप्रसाद लाहोटी, विभागीय परिषद सचिव ला.ॲड अमिता कारंडे व पदाधिकारी उपस्थित होते.
       माजी प्रांतपाल मार्गदर्शक ला. प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्षपदी कार्य करताना सन २०२२-२३ मध्ये ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या सहकार्याने , समाजाच्या अभुदयासाठी केलेले सेवाकार्य , सदस्यत्व वृद्धी, संस्थात्मक उत्कृष्टता , नेतृत्व व  मार्केटिंग  क्षेत्रातील  कार्य प्रमाण मानून लायन्स इंटरनॅशनलकडून हा क्लब एक्सलन्स  अवार्ड देण्यात आला. यामुळे सांगोला लायन्स क्लबच्या विविध सेवा कामगिरीला प्रतिष्ठा प्राप्त झाली व सेवेचा प्रभावही वाढला आहे. या  यशाबद्दल लायन्स क्लब ऑफ सांगोला सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)