मोदी सरकारच्या कार्याचा लेखाजोखा जनतेसमोर : राजेश मुगळे

0
नमो विकास रथ पंढरपुरात 

          पंढरपूर (प्रतिनिधी) - नमो विकास रथ बुधवारी पंढरपुरात दाखल झाला होता. या रथाद्वारे सोलापूर लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षाच्या कार्यकाळातील झालेल्या कामांचा लेखाजोखा तसेच शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक यांना केंद्रबिंदू मानून विविध लाभाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम नमो विकास रथाद्वारे केले जात आहे.
सोलापूर येथील स्थापत्य अभियंता असलेले राजेश मुगळे यांच्या संकल्पनेतून सोलापूर येथून सुरू झालेला नमो विकास रथ पुढे अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा मार्गे बुधवारी पंढरपुरात दाखल झाला होता.

         यावेळी बोलताना राजेश मुगळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांना उजाळा देण्यासाठी नमो विकास रथ गावोगावी वाड्या-वस्त्यांवर  नेण्याचे काम केले जात आहे.

             माझे वडील जनसंघाचे कार्य करत होते तर मी सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करत आहे. सोलापूर लोकसभेसाठी मी इच्छुक असून समाजाच्या हितासाठी काम केले आहे.
मी स्थापत्य अभियंता असल्याने मला संधी मिळाल्यास सोलापूर स्मार्ट सिटी, लोकसभा कार्यक्षेत्रात असलेल्या पंढरपूर, अक्कलकोट, मंगळवेढा या तीर्थक्षेत्रांचा विकास उत्कृष्ट रित्या होण्यास मदत होईल.
         यापूर्वी सोलापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक यासह विविध महापुरुषांची स्मारके करण्याची संधी मिळाल्याने मी ती उत्कृष्टरित्या पार पाडली आहे. मागील काळातही मी इच्छा व्यक्त केली मात्र मला थांबावे लागले. अशी खंत व्यक्त केली.
          यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुगळे म्हणाले की, सोलापूर लोकसभेसाठी अनेक इच्छुक आहेत. अमर साबळे हे समन्वयक असल्याने पक्षाच्या कार्यपद्धतीमुळे ते उमेदवार होऊ शकत नाहीत. विद्यमान खासदारांकडे असलेल्या जात प्रमाणपत्रावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यामुळे आगामी निवडणुकीत
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती मधील मोठी लोकसंख्या असलेल्या स्थानिक उमेदवाराला संधी द्यावी. अशी मागणी पक्ष श्रेष्ठींकडे करणार असल्याचे उद्योजक राजेश मुगळे यांनी सांगितले.
        यावेळी शिवलाल राठोड, बसवराज मुस्के, राहुल कौलगुडे, उमेश शिंदे उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)