पंढरपूर (प्रतिनिधी) - वाखरी येथील शहीद मेजर कुणाल गोसावी स्मारक येथे भारत मातेचे थोर सुपुत्र शौर्य चक्र प्राप्त शहीद मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी यांच्या चाळीसाव्या जयंतीनिमित्त शहीद स्मारकास आदरांजली कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मार्च रोजी सकाळी ९:३० वाजता जिल्हा समाज कल्याण अधिकारी माननीय सुनील खमितकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय टी. वाय. मुजावर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
याप्रसंगी माजी सैनिकांचा सन्मान, अग्निवीरांचा सन्मान, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.