कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रम
पंढरपूर (प्रतिनिधी) - आधुनिक भारताने स्वत:चे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून अख्य्या विश्वाला आपल्या सामर्थ्याची ओळख करून दिली आहे. स्वदेशी तंत्रज्ञानामुळे भारताने आपले प्रभुत्व सार्या जगाला दाखवून दिले असून संरक्षण क्षेत्रामद्धे भारत आत्मनिर्भर बनला आहे असे प्रतिपादन भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओचे जेष्ठ शात्रज्ञ डॉ. काशीनाथ देवधर यांनी केले. श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालय मध्ये दि २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात ते “संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान” या विषयावर बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. काशीनाथ देवधर यांनी भारताचे स्वयंपूर्ण आधुनिक तंत्रज्ञान, भारताची सार्वभौमत्ता, एकात्मता, नौसेना, वायुदल तसेच विविध शस्त्रांची निर्मिती आदी विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आधुनिक तंत्रज्ञानातून भारत हा लवकरच विश्वगुरू बनेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या बरोबर काम करीत असतानाचे आलेले अनुभव त्यांनी यावेळी कथन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्व सांगून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे संशोधन करून भावी अभियंत्यानी भारताला अधिक भक्कम बनवावे असे आवाहन त्यांनी केले. कर्मयोगीच्या मेकॅनिकल विभाग व इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी सदरच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. कणसे, रजीस्ट्रार श्री. जी. डी. वाळके, उप प्राचार्य प्रा. जे. एल. मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, विभागप्रमुख प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. दीपक भोसले, प्रा. एस. एम. लंबे, प्रा. अभिनंदन देशमाने व इतर सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.