पंढरपूर (प्रतिनिधी) - पेशवा युवा मंचच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन केले आहे. रविवार दि.२८ एप्रिल २०२४ रोजी येथील पद्मशाली धर्मशाळेमध्ये सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज आपल्या पाल्याचा उपनयन संस्कार श्रीक्षेत्र पंढरीत व्हावा यासाठी प्रयत्नशील असतो. बदलत्या सामाजिक परिस्थितीत हा संस्कार करणे फार जिकिरीचे आणि आर्थिक ओढाताणीचे ठरत आहे .सर्वसामान्य व आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील बटूस भूवैकुंठ पंढरीमध्ये ब्रह्मचर्याचा संस्कार मिळावा आणि त्यासोबतच त्याच्या कुटुंबाची आर्थिक बचत व्हावी या दुहेरी हेतूने पेशवा युवा मंचने या भव्य समारंभाचे आयोजन केले आहे. या व्रतबंध सोहळ्यात सहभागी होणाऱ्या बटूस सोवळे, उपरणे, पळी, पंचपात्र, संध्येची पोथी मोफत देण्यात येणार आहे. बटू सोबत येणाऱ्या दहा लोकांची मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. संस्कारानंतर बटूंची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून यामध्ये शहरातील समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन पेशवा युवा मंचचे अध्यक्ष श्री. अभिजीत पुराणिक व उपाध्यक्ष श्री. गौरव देशपांडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ९७६५२७७३२५ व ९७६४२८३७३३ या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा.