पंढरपूर हे वैद्यकीय सेवेचे हब झाले आहे : किशोरराजे निंबाळकर
पंढरपूर (प्रतिनिधी) - पुर्वी एखादा मोठा आजार झाला कि उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत होती. परंतु आता पंढरपूर येथेच वैद्यकीय सेवेचे हब निर्माण झाल्याने सर्वच आजारांवर चांगले उपचार मिळू लागले आहेत. अशातच हृदयाच्या सर्व आजारांवर उपचार करणार्या हृदयस्पंदन क्लिनीकची भर पडली असल्याने पंढरीतील वैद्यकीय सेवा अधिक भक्कम होत आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा आयोगचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी केले.
पंढरपूर येथे डॉ.बसवराज सुतार यांच्या हृदयस्पंदन या हार्ट केअर क्लिनीकचे उद्घाटन किशोरराजे निंबाळकर, ब्रम्हानंद सुतार, सुवर्णा सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निंबाळकर बोलत होते. या कार्यक्रमासाठी श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वनाथ भरमशेट्टी, स्वेरीचे डॉ.बी.पी.रोंगे, नागेश भोसले, डिव्हीपीचे अमर पाटील, माजी सभापती सिध्दार्थ गायकवाड, डॉ.व्ही.ए.व्होरा, डॉ. शितल शहा, डॉ. सुरेंद्र काणे, डॉ. वर्षा काणे, डॉ. तेजस भोपटकर, डॉ. सुनिल कारंडे, डॉ. महेश सुंडके, डॉ. अमरसिंह जमदाडे, डॉ. संजय देशमुख, डॉ. सुनिल पवार, डॉ. कोल्पकवार, नगरसेवक सुजित सर्वगोड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना निंबाळकर यांनी सांगितले की, डॉ .बसवराज सुतार यांच्या या हृदयस्पंदन क्लिनीकच्या माध्यमातून आरोग्य सेवा हिच ईश्वर सेवा माणून सेवा दिली जाईल. या माध्यमातून दिली जाणारी अधुनिक उपचार पध्दती ही अनेकांचे जीवन सुखकर करण्यासाठी महत्वपुर्ण ठरणार आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविकामध्ये डॉ. बसवराज सुतार यांनी सांगितले की, रुग्णांना परवडेल असे योग्य उपचार अधुनिक पध्दतीने देण्याचा मानस असून हृदयाच्या सर्व अजारांच्या उपचारासह मार्गदर्शनाचा संकल्प ठेवला आहे. तर जिल्ह्यातील एकमेव इलेक्ट्रोफिजिओजिस्ट उपचार या ठिकाणी होणार आहेत. असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी रामचंद्र सुतार, डॉ. उमाश्री सुतार, नेहा सुतार यांच्यासह डॉ. सानिका भट्टड, संपर्क अधिकारी महेंद्र कांबळे , कोमल पांढरे यांच्यासह इतर डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.