मराठा आरक्षणात भाजपा दिशाभुल करीत असल्याचा आ.शिंदेंचा आरोप
पंढरपूर (प्रतिनिधी) - सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून आ. प्रणिती शिंदे यांचा गावभेट दौरा सुरू असून या दौऱ्याच्या निमित्ताने त्या पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे आल्या असता मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करीत त्यांच्या गावातील बैठकीस विरोध केला.
आमदार प्रणिती शिंदे या आपल्या नियोजीत गावभेट दौर्यानुसार पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे पोहचतास येथील सकल मराठा समाजाच्या मराठा अंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली. तर मराठा आरक्षणबाबत आमची लढाई सुरू असताना त्याची दखल घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही लोकप्रितनिधी अथवा पुढार्यांनी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे गावामध्ये कोणत्याही पक्षाची बैठक होवू देणार नाही. अशा प्रकारची भुमिका यावेळी मराठा आंदोलकांनी घेतली आहे.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे व अभिजित पाटील तसेच काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी या अंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.परंतु या कोणत्याही प्रयत्नांना वाव न देता अंदोलकांनी शिंदे यांनी बैठक घेवूच नये अशी भुमिका मांडली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी अंदोलकांची समजूत काढताना मराठा आरक्षणाच्या भुमिकेस आपला पाठींबा असून त्या बाजूनेच आपण प्रयत्न करीत असून या उलट सत्ताधारी भाजपा सरकारकडून याबाबत दिशाभुल होत असल्याचे सांगत भाजपा सरकारवर टिका केली.
यावेळी कॉग्रेसचे शहर, जिल्हा तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते तर देशाचे आदरणीय नेते शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते अभिजित पाटील यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.आणि गोपाळपूर येथिल नागरिक व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
--------------------------------------------------
आ.प्रणिती शिंदेंकडून भाजप विरोधात घोषणाबाजी...
गोपाळपूर येथे कोणतीही बैठक आमदार प्रणिती शिंदे यांनी घेवू नये.असा विरोध करत येथील कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा आडवला खरा परंतु आमदार शिंदे यांनी या आंदोलकांना समजावून सांगताना मराठा समाजाच्या आरक्षण प्रकरणी भाजपा सरकार कशाप्रकारे दिशाभुल करीत आहे. हे सांगण्याचा प्रयत्न करून भाजपा सरकार व देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली. तर त्यांना उपस्थित काँग्रेस पदाधिकारी यांनी उत्साहात साथ दिली.
--------------------------------------------------