अभयसिंह जगताप यांनाच माढ्यातून उमेदवारी द्या..... महविकास आघाडीतून मागणी

0


म्हसवड येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात महविकास आघाडीतून मागणी

 

           सातारा (प्रतिनिधी) - माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेले- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस-  अभयसिंह जगताप यांना माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी  म्हसवड येथे आयोजीत संवाद मेळाव्यात करण्यात आली.


           या मेळाव्यासाठी माढा लोकसभा मतदार संघातील सर्वच भागातील महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, अभिनेते किरण माने, कविता म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्ष संतोष वारे यांच्यासह माढा लोकसभा मतदार संघात समिविष्ट असलेल्या विविध तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विविध पदाधिकारी, शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

           या मेळाव्यात जगताप यांच्या उमेदवारीच्या मागणीस समर्थन देण्यासाठी हजारो समर्थक उपस्थित होते. यावेळी मनोगते व्यक्त करताना अभयसिंह जगताप यांनी आजवर शरद पवार यांच्यावर कडवी निष्ठा ठेवून आपले कार्य सुरू ठेवले आहे. त्यामुळे या निष्ठावंत शिलेदारास यावेळी संधी मिळावी या मागणीसाठी जोर धरण्यात आला. हात उंचावून सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी आग्रह धरला व उमेदवारी देण्याची मागणी केली. 

--------------------------------------------------

ठरवाल ते धोरण अन् बांधाल ते तोरण

         म्हसवड येथील मेळाव्यात अभयसिंह जगताप यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की, हा उपस्थित  जनसमुदाय मला उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहे. त्यासाठी मी इच्छुक आहे; मात्र "तुतारी" देताना केवळ निष्ठावंत पाहून उमेदवारी द्यावी. त्यासाठी आपले ठरवाल ते धोरणं आणि बांधलं ते तोरण यासाठी आमचाही पाठिंबा असेल असेही जगताप यांनी सांगितले.

--------------------------------------------------

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)