आमदार समाधान आवताडे यांच्या विशेष प्रयत्नातून विकास कामाचे भूमिपूजन

0
           पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासरत्न पाणीदार आमदार मा.श्री.समाधान दादा आवताडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण  योजनेअंतर्गत निधी मंजूर झालेल्या पंढरपूर प्रभाग क्रमांक 14 येथे मंजूर झालेल्या 1 कोटी 48 लाख 60 हजार रुपयाचे विकास कामाचे  भूमिपूजन समारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती तथा युवक नेते मा.श्री. सोमनाथजी आवताडे मालक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

       अशा विविध ठिकाणी शहरी भागातील दळणवळण सुविधा सुरळीत व वेगवान होण्यासाठी ग्रामीण वस्त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. सर्वांगीण विकासाची ही गरज ओळखून आमदार महोदय यांच्या माध्यमातून मतदार संघातील सर्वच रस्ते चकाचक होत असल्याचा मनस्वी आनंद आणि मोठे समाधान जनतेच्या मनात असल्याचे प्रतिपादन मा.सभापती महोदय यांनी यावेळी व्यक्त केले.

         सदरप्रसंगी  यांच्यासह या भागातील स्थानिक नागरिक व इतर जेष्ठ मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)