आरोपीचा लावला तालुका पोलिसांनी काही तासात शोध..... केले जेरबंद
पंढरपूर (प्रतिनिधी) - मौजे आंबे चिंचोली येथे दगडाने मारले होते याचा राग मनात धरून एका व्यक्तीच्या डोक्यात
कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची
घटना मंगळवारी घडली होती. याची
माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी तपासचक्रे फिरवून अवघ्या दोन तासात आरोपीला अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणपत बबन जाधव (रा. कार्ला, ता. मावळ, जि. पुणे, सध्या रा. भीमा नदीपात्र बठाण, ता. मंगळवेढा) यांना सागर वाघमारे याने तू मला घरी सोडले नाही म्हणून दगडाने मारहाण केली होती. याचा राग जाधव यांना होता. मंगळवारी रात्री सातच्या सुमरास आता मी तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून जाधव याने सागर यांच्या डोक्यात, तोंडावर व कानावर कुऱ्हाडीने मारहाण केली. तसेच कुऱ्हाडीच्या दांडक्याने गळ्यावर, छातीवर, माडीवर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करून ठार मारले आहे.
याबाबत मयताची पत्नी यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. तत्काळ पोनि मुजावर यांनी तपासचक्रे फिरवली.जाधव पळून जाण्याचा मार्गावर असताना त्याला पकडले. सविता सागर वाघमारे (वय २४) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
ही कामगिरी पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधिक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलिस अधिकारी देवकर, विक्रम वडणे, पोफौ दत्तात्रय तोंडले, गजानन माळी, अंगत नलावडे, दीपक भोसले यांनी केली.