पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने कर वसुलीसाठी धडक मोहीम.....
अकरा मालमत्तावर जप्तीची कारवाई
पंढरपूर (प्रतिनिधी) - नगरपरिषदेच्या वतीने कर वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली असून या याकामी प्रशासक सचिन इथापे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, उपमुख्याधिकारी अँड.सुनिल वाळूजकर, कर अधिकारी सुप्रिया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २४ कर्मचाऱ्यांचे ८ विशेष वसुली पथके तयार करण्यात आली आहेत.
पंढरपूर शहरांमध्ये एकूण २२५०९ मालमत्ता असून आत्तापर्यंत या मालमत्ता धारकाकडे १४ कोटी रुपये कराची मागणी असून यापैकी ८ कोटी ८० लाख वसूल झालेले आहेत. अजून ५ कोटी २० लाख रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे सदरची थकबाकी वसूल व्हावी म्हणून नगर परिषदेने ४६५० मालमत्ता धारक यांना जप्तीच्या नोटीसा बजावले आहेत वारंवार तोंडी लेखी सूचना व नोटीस देऊनही अनेक नागरिकांनी कराची रक्कम अद्याप पर्यंत भरलेली नाही त्यामुळे नगर परिषदेने आतापर्यंत ११ मालमत्ता सिल केल्या असून १३ नळ कनेक्शन तोडलेले आहेत व अजून जप्तीची व नळ तोडण्याची कारवाई युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच प्रत्येक मुख्य चौकामध्ये १० ठिकाणी बॅनर द्वारे कर भरणे ही आपली जबाबदारी आहे आवाहन ही करण्यात आलेले आहे. या विशेष वसुली मोहिमेंतर्गत शहरातील व मार्केट कमिटी मधील काही गाळे थकबाकी वसुलीसाठी उपमुख्याधिकारी अँड. सुनील वाळूजकर, कर अधिकारी सुप्रिया शिंदे, वॉरंट लिपिक संभाजी देवकर, कर लिपिक उमेश पानादी, जयंत पवार, केतन बुध्याळ, उमेश कोटगिरी, समीर शेंडगे, पांडुरंग देवमारे, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे या विशेष वसुली पथकाने गाळे सिल केले आहेत. तरी शहरातील सर्व नागरिकांनी नगर परिषदेचा कर त्वरित भरावा अन्यथा नळ तोडणे, मालमत्ता जप्त करणे, थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे यासारख्या कटू कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. तरी कराची, पाणी पट्टीची रक्कम भरून नगर परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी केले आहे.