धर्माचे राजकारण करणाऱ्या भाजपाने देशाला कर्जाच्या खाईत लोटले -- निरंजन टकले

0
          पंढरपूर (प्रतिनिधि)   -  मोदी की गॅरंटी असे मोदी म्हणात देशाला फसवित आहेत हिंदुत्वाचे  राजकारण करणाऱ्या भाजपने गेल्या १० वर्षात देशाला  कोटींच्या कर्जात लोटले आहे असे उदगार शोध पत्रकार, पुरोगामी विचारांचे निरंजन टकले यांनी पंढरपूर येथे सोलापूर शहर, जिल्हा कॉंग्रेस कमिटी व इंडिया आघाडीच्या वतीने "हाती हात धरू संकल्प विजयाचा करू" ! या संकल्प सभेत बोलले.
           पुढे बोलताना ते म्हणाले की पंढरपूर हे गाव सर्व धर्म समभाव जपणारे गाव आहे.या मोदी सरकारला पराभूत केले पाहिजे. यावेळी त्यांनी भाजपा सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. पंढरपूर येथील श्री संत तनपुरे महाराज मठ येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, चेतन नरोटे, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष सूनंजय पवार, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष संदीप शिंदे, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, बजरंग बागल, सुरेश हसापुरे  आदि मान्यंवर उपस्थित होते.
          यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, उद्या येणारी लोकसभा निवडणुक अस्तित्वाच्या लढाईची असणार आहे याचे भान सर्वांनी राखले पाहिजे.दुफळी निर्माण करणारे हे भाजप सरकार पराभूत झाले पाहिजे. काँग्रेस नेत्यांनी अत्यंत कष्टाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे.
        यावेळी इंडिया आघाडीच्या या संकल्प सभेत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात आज पर्यंत जी विकास कामे झाली यामध्ये देशाचे नेते शरदचंद्रजी पवार व सुशिलकुमार शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे.
         सोलापूरचे उजनी धरण, सोलापूर पाणी प्रश्न, शैक्षणिक, साहित्यिक, आरोग्य विषयक तसेच व्यापारी, उद्योजक व्यावसायिक यांच्या साठी भरीव कामगिरी केली आहे तर विमानतळ, एन टी पीसी, औद्योगिक क्षेत्र, सोलापूर जिल्हा दुष्काळ भाग, शेतकरी व शेती, शेतमजूर, शेतमाल या विषय प्रश्नांना बाबत जागरूकता निर्माण करून ऊस लागवड, फळबागा, भाजीपाला, तसेच विविध शेतकरी उत्पादन याबाबत अनेक योजना यांनी
राबविलेल्या आहेत.आज सोलापूर शहर व जिल्ह्यात  विविध सर्व सामान्य जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

           या संकल्प सभेत मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, शहर अध्यक्ष किशोर पवार, महिला जिल्हा अध्यक्ष शाहीन शेख, सुभाष अण्णा पाटील, राजेश पवार, सुरेश शिवपुजे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयनाता गायकवाड, राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष सुवर्णा शिवपूरे, उत्तर सोलापूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रल्हाद काशीद, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष मयूर खरात, विनोद भोसले, गणेश डोंगरे, सुशील बंदरहे, सिद्धाराम पवार, बाळासाहेब डूबे पाटील, शिवसेनेचे बाळासाहेब वाघमोडे, तुकाराम माने, राष्ट्रवादीचे पवनकुमार गायकवाड, दाजी साहेब कोकाटे रत्नाताई कसबे विद्या कोरकुळ भीमराव वसेकर, तिरुपानी परकीपंडक्ला, अजित जगताप, कुलदीप पवार, रफिक पाटील, वैभव कुचेकर, शाहीर आवळे, युवराज रणदिवे, प्रमोद खंडारे शिवाजी खिल्लारे, निलेश जग दत्ता सावंत, शंकर सातपुते, संभाजी सातपुते, राजशेखर पार्टील, शिवाजी वाघट, विजयकुमार पवार, विद्या, कोळकुर राजेंद्र मोठे, चेतन कसबे, सोहेल शेख, शरद गुंड पाटील, बिलाल शेख बिराखरात, स्याम चव्हाणा लक्ष्मण भालेराव, बाबुराव पाटील, ज्ञानेश्वर कदम, देविदास गायकवाड, ज्ञानेश्वर पाटील, रतन कसबे, शबाना तांबोळी, सारिका गावी मीनाक्षी पवार, यशोदा लोखंडे, यांच्यासह हजारो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)