लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्यावतीने दिव्यांग ग्रामस्थांना मदत

0
        पंढरपूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संजय साठे यांच्या प्रयत्नातून दिव्यांग ग्रामस्थांना प्रत्येकी तीन हजार रुपये मदत निधी वाटप करण्यात आला आहे.
          राज्य सरकारच्या नियमानुसार ग्रामपंचायतीच्या वार्षिक वसुली उत्पन्नातून पाच टक्के निधी दलित आणि दिव्यांग बांधवांना द्यावा असा नियम आहे. या नियमानुसार दरवर्षी दलित आणि दिव्यांग बांधवांना मदत निधी देणारी लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
        विद्यमान सरपंच संजय साठे यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे, माजी आमदार प्रशांत परिचारक, युवा नेते उमेश परिचारक, तसेच सोलापूर जिल्हा परिषद माजी सदस्य रामदास ढोणे यांच्या मार्गदर्शनात लोकोपयोगी कामाचा सपाटा लावला आहे.
         त्याच अनुषंगाने गेल्या आर्थिक वर्षात दलित बांधवांना मदत निधीचे वाटप करण्यात आले होते. तर चालू आर्थिक वर्षात लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत वार्षिक वसुली उत्पन्नातून पाच टक्के मदत निधी दिव्यांग बांधवांना दिला आहे. गावातील 85 दिव्यांग बांधवांना एका छोटेखानी समारंभात सन्मानपूर्वक गुलाब पुष्प व प्रत्येकी तीन हजार रुपये निधी प्रदान करण्यात आला.
यावेळी सरपंच संजय साठे, उपसरपंच महादेव पवार, ग्रामविकास अधिकारी जयंत खंडागळे, तसेच ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार वाघमारे, नागरबाई साठे, औदुंबर ढोणे, आशाबाई देवकते, सागर सोनवणे, रेश्मा साठे, संदीप मांडवे, रोहिणी साठे, समाधान देठे, रूपाली कारंडे, गोवर्धन देठे, सुरेखा खपाले, रुक्मिणी जाधव विजयमाला वाळके, शितल कांबळे, यांच्यासह गावातील दिव्यांग बांधव त्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)