अनेक दिगाज नेत्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर शहरालगत असलेल्या गोपाळपूर याठिकाणी नव्याने बांधण्यात येत असलेल्या ग्रामसचिवालयाच्या इमारतीचे भूमिपूजन शनिवार दि. 2 मार्च रोजी संपन्न झाला आहे. या कार्यक्रमासाठी पंढरपूर तालुक्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहिले होते.
याबाबत मोहोळ विधासभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी मोठा पाठपुरावा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि आ. भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून एक कोटीचा निधी मंजूर करून दिला आहे. या इमारतीचे भूमिपूजन उद्योजक राजू खरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ. समाधान आवताडे यांचे बंधू सोमनाथ आवताडे आणि विठ्ठल सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी भूषविले.
या कार्यक्रमासाठी उपस्थिती म्हणून युवा नेते प्रणव परिचारक, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, स्वरीचे संस्थापक सचिव डॉ.बी पी रोंगे, पांडुरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिशदादा गायकवाड, पंढरपूर नगरपालिका माजी नगराध्यक्ष वामनतात्या बंदपटे, बाजार समितीचे उप सभापती राजूबापू गावडे, पांडुरंगचे संचालक दिलीप गुरव आदीसह अनेक मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उद्योजक राजू खरे यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की, कोणतेही काम करीत असताना केवळ आमदार आणि खासदार असून चालत नाही तर काम करण्याची इच्छा शक्ती आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या भागाचा विकास करण्यासाठी राजकारणाचे जोडे बाहेर सोडून विकास करत राहू. त्यासाठी मी तुमच्या सोबत असेल असेही सांगितले. गोपाळपूर येथील मंदिरासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचेकडे आपण सर्वजण मिळून जाऊन मोठा विशेष निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करूया असेही यावेळी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात भगीरथ भालके यांनी गोपाळपूर गावातील राजकारण इतर गावचे तुलनेने वेगळे असल्याचे सांगत, या गावात फक्त मतदान पुरते राजकारण आणि इतर वेळी एकोप्याने असणारे गोपाळपूर असल्याचे सांगितले. आपल्या भागातील असलेले राजू खरे यांना आपण यापुढील काळात साथ देण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखविली पाहिजे असेही सांगितले.
या कार्यक्रमाचे वेळी रा . पा. कटेकर, चांदाताई तिवाडी, माऊली हळंनवर, अर्जुन जाधव, महादेव सुर्यवंशी, सुभाष हुंगे पाटील, नितीन शेळके, प्रकाश पारवे, उमाकांत करंडे, विजय खरे, आदी उपस्थित होते.