सदर रूट मार्च करता डी वाय एस पी अर्जुन भोसले साहेब पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर साहेब यांचा स्टाफ, मुख्यालय सोलापूर येथील कमांडो पथक आणि सी आय एफ या सशस्त्र बलाची कंपनी असा फौज फाटा उपस्थित होता. या रूट मार्चने सर्व नागरिकांचे लक्ष वेधले.
पंढरपूर तालुका पोलिसांचे लोकसभा निवडणुका, उत्सवच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च
March 09, 2024
0
पंढरपूर दि. 9 (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुका पोलिसांचे लोकसभा निवडणुका त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव तसेच आगामी लोकसभा निवडणुका मतदान आणि मतमोजणीच्या अनुषंगाने पंढरपूर तालुक्यातील मौजे तुंगत चिंचोली या गावातून माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अर्जुन भोसले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ सीआयएसएफ प्यारा मिलिटरीची एक कंपनी व सोलापूर ग्रामीण आर सी पी येथील कमांडो पथक मौजे तुंगत नारायण चिंचोली या गावातून मिरवणूक मार्गावरून व सार्वजनिक वस्ती भागातून त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक जय भीम नगर तुंगत या भागातून या गावातील प्रमुख मार्गावरून रूट मार्च घेण्यात आला.
Tags