विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार

0
         पंढरपूर (प्रतिनिधी) - जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांचे वतीने माढा लोकसभा मतदार संघात  आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक राज्याचे अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब व खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
       यावेळी बोलताना माढा मतदार संघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दहा वर्षे मोदी सरकारने केलेल्या विकास कामांचा आढावा वाचून दाखवला. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व मोदींची विकास गंगा आपल्या भागात आणण्यासाठी मला विजयी करावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी हजारो कार्यकर्ते  उपस्थित होते.
      यावेळी  माढा मतदारसंघातील रामोशी समाजाचे अनेक माता भगिनी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. रामोशी समाजाने येत्या निवडणुकीत खासदार रणजितसिंह नाईक  निंबाळकर यांना भरघोस मतांनी निवडूण देण्याचा शब्द दिला. 
            जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)