पंढरीत मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतली आढावा बैठक
माढा आणि सोलापूर मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती
पंढरपूर (प्रतिनिधी) - या लोकसभा निवडणुकीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. त्यानुसार मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आज गुरुवारी पंढरपूर येथील मनसे कार्यालयात प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक घेतली. यामध्ये सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघातून भाजप महायुतीचे उमेदवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
राज ठाकरे यांनी संपूर्ण राज्यातील निवडणुकीत सुसूत्रता यावी यासाठी मनसेच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. यामध्ये माढा आणि सोलापुरसह बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिलीप धोत्रे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळी ११वाजता माढा आणि सोलापूर मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेण्यात आली.
या घेण्यात आलेल्या बैठकीत महायुतीचे नेत्यांसोबत समन्वय साधण्यासाठी नियोजन करण्यात आले. या निवडणूक प्रचार आणि मोठ्या सभामधील नियोजन ठरविण्यात आले. यावेळी माढा मतदार संघातून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूर मतदार संघातून आ. राम सातपुते यांच्यासाठी सर्व मनसे कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला .
या बैठकीचे वेळी भाजपचे शशिकांत चव्हाण, भास्कर कासगावडे हे भाजपचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, विनायक महिंद्रकर, प्रशांत इंगळे, जैनुद्दिन शेख, अमर कुलकर्णी, रांजनाताई इंगोले, शाहूराजे देशमुख, अनिल केदार, शशी पाटील, मारुती वाघमोडे,चंद्रकात पवार, सतीश फंड, किसन पाटील , भारतीताई चौगुले, शंकर खाडे, स्वप्नील नागणे, स्वप्नील कोळी, दिगंबर शिंगाडे, नागेश इंगोले, सचिन कसबे, नारायण गोवे, यांचेसह सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्यातील मनसेचे तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.