कर्मयोगी इन्स्टिट्यूट मधे राज्यस्तरीय तंत्रपरिषद..... अनेक समाजाभिमुख प्रकल्पांचे सादरीकरण.
पंढरपूर (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीचे ज्ञान व बदलते तंत्राद्यान तसेच दैनंदिन जिवनातील लोकांच्या समस्या यांची योग्य सांगड घालून समजाभिमुख संशोधन करावे. तसेच अभ्यासातील सातत्य, स्वयंशिस्त, मनोधैर्य, संयम, चांगल्या सवयी, व्यक्तिमत्व, संभाषण कला व साकारात्मक विचारसरणी हे गुण प्रत्येक विद्यार्थ्यांनी अंगिकारणे आवश्यक आहे. कर्मयोगीच्या “कर्माटेक २४” या तंत्रपरिषदेतून मोठ्या प्रकल्पांची निर्मिती होऊन नवीन शोध जन्माला येतील असा विश्वास कम्मीन्स इंडिया प्रा. लि.चे श्री. अमर माळी यांनी व्यक्त केला.
दि. ६ एप्रिल २०२४ रोजी कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालय शेळवे, पंढरपूर मध्ये आयोजित केलेल्या “कर्माटेक - २४” या राज्यस्तरीय तंत्र परिषेदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून महाविद्यालयाची ओळख करून देऊन स्पर्धेमधील सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक म्हणाले की, विद्यार्थ्यानी केवळ परीक्षेमद्धे गुण मिळविण्यासाठी ज्ञान संपादन न करता चौकस बुद्धिमत्ता ठेऊन ज्ञान मिळवावे. तसेच विद्यार्थ्यानी संशोधनवृत्ती विकसीत करून एक अभियंता म्हणून सर्वसामान्य जनतेचे जीवन अधिक सुखकर कसे होईल या दृष्टीने संशोधन करावे. अनेक छोट्या प्रकल्पांमधूनच समाजातील लोकांचे जिवन सुलभ होत असते. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी समाजातील लोकांचे दैनंदिन जीवनातील समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी संशोधनात्मक प्रकल्प तयार करावेत. एक यशस्वी अभियंता निर्माण होण्यासाठी कर्मयोगीमधील सर्व प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना सदैव मार्गदर्शन लाभेल अशी ग्वाही ही त्यांनी याप्रसंगी दिली.
कर्माटेक २४ तंत्रपरिषदेचे संयोजक प्रा. एस एम लंबे यांनी प्रस्तावना करून “कर्माटेक २४” कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागील उद्देश सांगितला. सदरच्या परिषदेमध्येमध्ये अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांसाठी आयडिया प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, मॉडेल मेकिंग, ब्लाइंड सी, इलेक्ट्रॉनिक्स क्वीज, प्रोजेक्ट एक्सिबीशन, सर्किट सुडोकू अश्या विविध राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राज्यातील पाचशेहून अधिक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. प्रत्येक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना सुमारे पस्तीस हजारहून अधिक रुपयाची बक्षिसे प्रदान करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भविष्यामद्धे ही कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये असे अनेक उपक्रम राबविले जातील अशी ग्वाही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी दिली. या कार्यक्रमावेळी कर्मयोगी इन्स्टिट्युटचे माजी विद्यार्थी यशस्वी उद्योजक वैभव पाटील व अभियंता म्हणुन बहुराष्ट्रीय कंपनीमधे नावलौकिक मिळविलेले प्रीतम वठारे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानी यावेळी उपस्थीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शीत केले. सदरच्या कार्यक्रमासाठी श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. कणसे, रजीस्ट्रार जी. डी. वाळके, उप प्राचार्य प्रा. जे. एल. मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, संयोजक प्रा. एस. एम. लंबे , सह संयोजक प्रा. योगेश घोडके, विभागप्रमुख प्रा. अनिल बाबर, प्रा. एस व्ही एकलारकर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक वर्ग यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यामागे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच प्रा. अमरजीत देवकर, प्रा. ए. ए. जोशी, प्रा. एन. बी. खाडे, प्रा. एस. एम. शिंदे, प्रा. डी. ए. राजगुरु, प्रा. आर. आर. हलचेरिकर, प्रा. पी. आर. कुलकर्णी, प्रा. यू. आर कार्वेकर, व्ही. एल. जगताप व प्रा. एस. एम. पवार यानी विविध स्पर्धेचे संयोजक म्हणुन काम पाहिले. सदर कार्यक्रम क्रेडायी पंढरपूर, श्रीनाथ गारमेंट्स, वायचळ ऑफसेट, योग वास्तू रियालीटी, ऐग्रो रिच बायोटेक, शर्विल प्रो , सर्विस आय क़्यू, श्री प्रसाद मेटल व सिव्हील इंजिनियरिंग आय आय टी यानी सहप्रायोजित केला होता. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन लक्ष्मी कुंटला, साक्षी भिंगे, भक्ति जाधव,अथर्व रोकडे या विद्यार्थ्यानी केले. प्रा. जे एल मुडेगावकर व प्रा. सुशील कुलकर्णी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.