राम सातपुते व रणजितसिंह निंबाळकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल;

0
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थोड्याच वेळात सभा

          सोलापूर (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे सोलापूर राखीव लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि माढा सर्वसाधारण लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले.

        राम सातपुते यांच्यासोबत आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख तसेच भाजपचे युवा नेते विकास वाघमारे या पाच जणांनी निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.


          तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमदार बबनराव शिंदे, आमदार जयंत गोरे, आमदार संजय शिंदे, आमदार शहाजी बापू पाटील या पाच जणांसोबत निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


     तसेच आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी ही पूरक म्हणून आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे दाखल केला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)