सोलापूर (प्रतिनिधी) -- संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेले माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे व महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील राजसिंह मोहिते - पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. विजयसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार नारायण आबा पाटील, जयसिंह मोहिते-पाटील, पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष काकासाहेब साठे, डाॅ. बाबासाहेब देशमुख, रघुनाथ राजे नाईक-निंबाळकर, शिवसेना नेते अनिल कोकीळ, शिवाजीराजे कांबळे, सुरेश हासापुरे व शितलदेवी मोहिते-पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.