सोलापूर (प्रतिनिधी) - सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी नववर्षाच्या आरंभी मतदारसंघातील विविध मंदिरांना भेटी देत मनोभावे दर्शन घेतले. मंगळवारी त्यांनी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य मठात जाऊन श्री श्री 1008 काशी पिठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
सोलापूर शहर व जिल्ह्यात हिंदू नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत कऱण्यात आले. त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी देखील परंपरेनुसार गुढी उभा करून पाडव्याचा सण साजरा केला. तसेच यावेळी शिंदे यांनी शहरातील विविध मंदिरात जात देवदर्शन केलं. यावेळी त्यांनी अक्कलकोट रोडवरील बृहन्मठ होटगी संस्थानाच्या वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य मंदिरास भेट दिली. याठिकाणी त्यांनी काशी पिठाचे जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांचे दर्शन घेतले.
यावेळी महास्वामी यांनी देखील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे यांना विजय प्राप्तीसाठी कृपाशीर्वाद दिले.