सोलापूर (प्रतिनिधी) - सोलापूर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा "महाविजय २०२४ संवाद मेळावा" भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीतील प्रत्येक घटकाने एकदिलाने काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन करताना काँग्रेसला 60 वर्षांत जे जमले नाही ते आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये 10 वर्षात कामे झाली असून त्यामुळे विकासाशी नाते असणारांच्या मागे उभे रहा असे आवाहन केले. मोदी सरकारच्या स्वच्छता अभियानातून आम्ही 100% शौचालय पूर्ण केली. मोदीजी यांनी उज्ज्वला गॅस, सौभाग्य योजना, शेतक-यांना पीक विमा व निवृत्ती वेतन आदी योजना राबवत महिला व शेतकरी वर्गाला न्याय दिला. आपल्या मतदारसंघात होत असलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सर्वांनी कामाला लागा आणि मोदी सरकारला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जोमाने काम करा असा निर्धार केला.
मी सर्वप्रथम एक कार्यकर्ता असून सोलापूर मतदारसंघाच्या परिवारातला एक सदस्य आहे. माझा संपूर्ण वेळ माझ्या परिवाराच्या उन्नतीसाठी देणार असून माझ्या परिवाराला मला विकसित पाहायचे आहे. या परिसरात रस्त्याची बांधणी, विमानतळ आणि तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यासाठीच्या पायभूत सुविधा विकसित करण्यासाठी माझे प्राधान्य असेल. आपले यावेळचे एक बहुमोल मत हे भाजपला म्हणजेच आपले एक मत हे राष्ट्रासाठी द्यावयाचे आहे’, असे आवाहन यावेळी बोलताना केले.
याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, लोकसभा प्रवास योजना प्रभारी संजय (बाळा) भेगडे,आमदार विजयकुमार देशमुख मालक, आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार व जिल्हाध्यक्ष सचिनदादा कल्याणशेट्टी, आमदार समाधानदादा आवताडे, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख, सहप्रमुख शहाजी पवार, जेष्ठ नेते किशोरजी देशपांडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, भाजप जिल्हा सरचिटणीस मनीष भैय्या देशमुख, विकास वाघमारे, विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश माने, राजेंद्र सुरवसे, श्रीकांचना यनम, विजयराज डोंगरे, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ता बांधव उपस्थित होते.