सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मोदीजींच्या नेतृत्वाची पुन्हा गरज - खा. धनंजय महाडिक

0
जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार,
विकास पर्व गतिमान करणार ! 


भीमा परिवार विजय संकल्प कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न

        मोहोळ (प्रतिनिधी) -  सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मोहोळ तालुक्यामधील टाकळी सिकंदर येथे भीमा परिवार विजय संकल्प कार्यकर्ता संवाद मेळावा खासदार श्री. धनंजयजी (मुन्नासाहेब) महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करुन विकसित भारताच्या दिशेने पाऊल टाकताना महायुतीच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा संकल्प मेळाव्यात करण्यात आला.
       यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी मार्गदर्शन करत ‘महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनात मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन मतदारसंघात काम केले पाहिजे. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाची पुन्हा गरज असून महायुतीच्या शिलेदाराला निवडून देण्यासाठी जोमाने काम करा, असा निर्धार यावेळी करण्यात आला. 

        आपल्या सोलापूर मतदारसंघात येत्या काळात अनेक विकासकामांना प्राधान्य देणार असून. कार्यकर्त्यांनी राम सातपुतेला मत म्हणजे मोदीजींना मत हे लक्षात ठेवून कामाला लागावे, असे आवाहन केले. 

         याप्रसंगी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेशजी पाटील, भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चरणराज चवरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश माने, तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, विश्वास महाडीक, प्रमोद जाधव, दीपक पुजारी, मंगल ओव्हाळ आदी पदाधिकारी, संचालक मंडळ व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)