अंधशाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

0
          पंढरपूर (प्रतिनिधी) -  लायन्स क्लब  यांची अंधविकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा पंढरपूर येथे आज शाळेचे लिपिक नितीन बळवंत कटप व महेश म्हेत्रे सर विशेष शिक्षक यांच्या शुभहस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
         सुंदर अशा स्वागत गीताने मुलांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर कु. आरोही दगडू वाघमारे हिने महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रोहिणी घोडके मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाकरिता अंधशाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)