प्रणिती शिंदेंकडून गुढीपाडवा साजरा; नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा

0
            सोलापूर (प्रतिनिधी) -  चैत्र प्रतिपदेनिमित्त देशभरातून मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत केले जात आहे. त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील आज जनवात्सल्य या निवासस्थानी गुढीपाडवा सण साजरा केला. यावेळी प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
         प्रणिती शिंदे सध्या मतदारसंघात गावभेटी दौरा करत आहेत. दरम्यान, आज नववर्षारंभी त्यांनी गुढी उभारत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी येत्या काळात सोलापूरमध्ये देखील विकासाच्या विजयाची गुढी उभारली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, गुढीपाडव्या निमित्त प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी शहरातील विविध मंदिरात जाऊन दर्शन घेत नागरिकांशी संवाद साधला आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)