आमदार राम सातपुते यांची प्रतिज्ञा
सोलापूर (प्रतिनिधी) - मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत फेटा बांधणार नाही, अशी प्रतिज्ञा भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केली आहे. याबाबत रविवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आमदार राम सातपुते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता आंदोलनात सहभागी झालेला मी कार्यकर्ता आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी विधानसभेत मी आवाज उठवला आहे. निवडून आल्यानंतरही मराठा आरक्षणासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. परंतु निवडून आल्यानंतरही मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मी फेटा परिधान करणार नाही. मोहोळ तालुक्यातील मराठा युवकांशी चर्चा करताना ही बाब मी त्यांना सांगितली आहे, असे आमदार राम सातपुते यांनी सांगितले.