१६ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते-पाटील उमेदवारी अर्ज भरणार

0
          अकलूज  (प्रतिनिधी) - १४ एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील  हे अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षामध्ये प्रवेश करणार असून दि. १६ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ते उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत अशी माहिती जयसिंह मोहिते पाटील यांनी आज रोजी दिली.

           शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठबळावर धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपा पक्ष सोडून अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षांमध्ये ते प्रवेश करणार असून येत्या १४ तारखेला अधिकृतपणे प्रवेश करून १६ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तुतारी या चिन्हाला सोबत घेऊन उमेदवारी अर्ज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ते भरणार आहेत. 

         जयसिंह मोहिते पाटील आपल्या मुलाखतीमध्ये पुढे बोलत असताना ते म्हणाले- सोलापूर जिल्ह्यातील त्याचप्रमाणे माळशिरस तालुका माढा तालुका व संपूर्ण सोलापूर जिल्ह्याभरातील आमच्या  पाच ते सहा हजार कार्यकर्त्यांनी भाजपाचा राजीनामा दिलेला आहे. आपल्या मुलाखती मधून त्यांनी जेष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे देखील ज्यावेळी शरदचंद्र पवार हे माळशिरस तालुक्यात येतील त्यावेळी त्यांच्या उपस्थितीमध्ये ते राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती जयसिंह मोहिते पाटील यांनी
दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)