माढा मतदार संघ भाजपकडून खेचून घेण्यासाठी खा. शरद पवार स्वतः मैदानात

0


माढा मतदार संघासाठी तब्बल सहा दिवस सभा घेण्याचे नियोजन

             अकलूज (प्रतिनिधी) - माढा लोकसभा मतदार संघातील सुरू असलेले अनेक तिढे सुटत चालले आहेत.  महाविकास आघाडीतील उमेदवार निवडीची चर्चा संपली आहे. आता हा मतदार संघ भाजपकडून खेचून घेण्यासाठी खा. शरद पवार स्वतः मैदानात उतरणार असून माढा मतदार संघासाठी तब्बल सहा दिवस सभा घेण्याचे नियोजन झाले आहे.

          महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील उतरले आहेत. त्यांच्यासाठी अनेक अडचणी होत्या. त्या अडचणी दूर करण्यात खा. शरद पवार यांनी आपली चाणक्यनीती वापरत उमेदवारीला भलतीच बळकटी आणून दिली आहे.

          खा. शरद पवार यांच्या जाहीर सभांचे आयोजन बुधवार २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मोडनिंब येथील मार्केट कमेटी मैदान, शुक्रवार २६ एप्रिल रोजी करमाळा मार्केट कमेटी येथे सकाळी १० वाजता, त्याच दिवशी दुपारी २ वाजता सांगोला येथे सभा होणार आहे. शनिवार २७ एप्रिल रोजी सकाळी १०वाजता दहिवडी, मंगळवार ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता फलटण, गुरुवार दि. २ मे रोजी सकाळी १० वाजता अकलूज येथे भव्य जाहीर सभा होणार आहे.
     वरील सर्व सभा माढा लोकसभा मतदार संघातील प्रमुख ठिकाणी होणार आहेत. यावरून धैर्यशील मोहिते पाटील यांचेसाठी स्वतः खा.शरद पवार यांनी पाच दिवसात सहा सभा घेणार आहेत. या सभांसाठी महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यकर्त्यांनी अगदी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन माढा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)