बँक व सभासद दोन्ही स्तरावर शंभर टक्के कर्ज वसुली होणारी सोलापूर जिल्ह्यातील पहिली सहकारी सोसायटी
पंढरपूर (प्रतिनिधी) - वाडीकुरोली विकास कार्यकारी सेवा सोसायटीची आर्थिक वर्ष 2003-24 मध्ये सभासदांना वितरित केलेल्या कर्जाची बँक स्तरावर 100% व संस्था स्तरावर 100टक्के बँक कर्ज वसुली झाली. सोलापूर जिल्ह्यात बँक व संस्था सभासद स्तरावर शंभर टक्के कर्ज वसूली होणारी पहिली सोसायटी आहे.
सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीकुरोली विकास कार्यकारी सेवा सोसायटी गेल्या अनेक वर्षापासून शंभर टक्के बँक व संस्था लेवल सभासद कर्ज वसुली होत असून त्यामुळे संस्थेला व सभासदांना आधिक लाभ मिळत आहे. शंभर टक्के कर्ज वसुली झाल्यामुळे बँकेकडून सोसायटीस अधिक आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार असून त्यामुळे सभासदांना जास्तीत जास्त कर्ज वाटप होण्यासाठी मदत होणार आहे. शंभर टक्के कर्ज वसूलीसाठी सोसायटीचे चेअरमन आप्पासो पाटील संचालक कांतीलाल काळे, अविनाश काळे निलेश काळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच पंढरपूर तालुक्याचे पालक अधिकारी व सहाय्यक व्यवस्थापक एम.पी. देशपांडे बँक इन्स्पेक्टर बी.ए. क्षीरसागर भंडीशेगाव शाखेचे शाखा अधिकारी समाधान मलपे कॅशियर ज्ञानेश्वर शेळके सचिव विश्वजित देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
सर्व सभासदांनी वेळेत कर्ज भरणा केल्याबद्दल तसेच संस्था व सभासद स्तरावर शंभर टक्के कर्ज वसुली होण्यासाठी विशेष प्रयत्न केलेबद्दल सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळाचे सभासद व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.