पहिल्या टेस्टसाठी विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद
पंढरपूर (प्रतिनिधी) - श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलीत कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयात मोफत मॉक एमएचटी-सीईटी च्या सराव परीक्षेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुलांना प्रत्यक्ष कम्प्युटरवर सीईटी परिक्षा कशी द्यायची याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्रवेशप्रक्रिया प्रमुख डॉ. अभय उत्पात म्हणाले की, बारावीच्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरवर ऑनलाईन परीक्षा देण्याचा सराव नसतो. मुख्य परिक्षेवेळी विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ होऊ नये व त्यांची प्रॅक्टिस होण्याच्या उद्देशातून कर्मयोगी कॉलेजने या मोफत मॉक टेस्टचा उपक्रम राबवला. यामधे एकूण १० प्रॅक्टिस टेस्टचे आयोजन करण्यात आले असून येथून पुढील नऊ टेस्ट या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतील. सदर परिक्षेवेळी मुलांना व्हाट्सअप द्वारे लिंक पाठवण्यात येईल व टेस्ट सोडवल्यानंतर त्याची उत्तरे त्यांना कळतील.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सदर मोफत उपक्रमाचा लाभ घ्यावा असे त्यांनी यावेळी सांगितले. ही ऑनलाइन परिक्षा यशस्वी करण्यासाठी प्रा. आर. जे. भोसले व डी. एम. चौगुले यांचे विशेष सहकार्य लाभले. श्रीपांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन रोहन परिचारक यांनी सदर उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, डॉ. ए. बी. कणसे, रजिस्ट्रार जी. डी. वाळके, प्रा. जे. एल. मूडेगावकर, डॉ. अभय उत्पात, विभाग प्रमुख प्रा. ए. टी. बाबर, प्रा. एस. व्ही. एकलारकर , प्रा. एस. एम. लंबे, प्रा. दिपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.