खरीप व रब्बी पिकांचे देशी वाण जतन करणे काळाची गरज- डॉ. अमोलिक

0
पिके संशोधन आणि प्रशिक्षण संपन्न

         पंढरपूर (प्रतिनिधी) - खरीप व रब्बी पिकांचे देशी वाण जतन करणे काळाची गरज असल्याचे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत मॉडेल जिनाम क्लब कृषी वनस्पतीशास्त्र विभाग म. फु.कृ.वि.राहुरी आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. विजू अमोलिक यांनी कडधान्य व तेलबिया पिके संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र पंढरपूर येथे व्यक्त केले. यावेळी त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी द्वारा प्रसारित कडधान्य, तृणधान्य, गळीत धान्य, भरड धान्य व नगदी पिकांचे सुधारित वाणांच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. तसेच सदर पिकांचे लागवडीखालील क्षेत्र वाढवण्याचे व पारंपारिक वाण जतन करण्याचे आवाहन शेतकरी बांधवांना केले.
        यावेळी कडधान्य व तेलबिया पिके संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र पंढरपूरचे प्रभारी अधिकारी डॉ. रमेश भदाणे यांनी कडधान्य व तेलबिया पिकांच्या सुधारित जाती व उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मानवी आहारातील कडधान्य पिकांचे महत्त्व विशद केले. परिसरातील नगदी पिकांचे लागवडीखालील क्षेत्र लक्षात घेऊन ऊस पिकांचे खोडवा व पाचट व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.
            तसेच श्री. शिवाजी चव्हाण कृषी अधिकारी कृषी विभाग पंढरपूर यांनी शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाची कृषी दर्शनी  वाटप करण्यात आली.
         शेतकऱ्यांना म. फु. कृ. वि. राहुरी प्रसारित बहुविध पिकांच्या देशी वाणांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे परिसरातील प्रगतशील शेतकरी श्री. गणपत बागल, सिताराम रणदिवे, प्रा. तानाजी घाडगे व पंढरपूर परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
      या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री रामचंद्र बनसोडे कृषी सहाय्यक यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी सर्वश्री लक्ष्मण नरोडे,  समाधान गवळी,  संतोष होटगीकर,  विकास काळे,  संतोष देशमुख व सोमनाथ वागज यांनी योगदान दिले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)