"जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा"

0


आमदार राम सातपुते यांचा हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या शोभायात्रेत सहभाग


हिंदू बांधवांनी दिल्या घोषणा

           सोलापूर (प्रतिनिधी) - "जो हिंदू हितकी बात करेगा वही देश पे राज करेगा", जय श्रीराम, "जो राम को लायें है हम उनको लायेंगे" अशा घोषणा देत हिंदू बांधवांनी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे स्वागत केले. गुढीपाडवानिमित्त हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सहभाग घेतला. यावेळी नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

          प्रारंभी ष. ब्र. श्री. श्रीकंठ शिवाचार्य नागणसुर यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी हिंदू नववर्ष महोत्सव समितीचे संस्थापक रंगनाथ बंग, भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

          तीर्थक्षेत्र श्री अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनंतरचा पहिलाच गुढीपाडवा असल्याने हिंदू समाजात मोठा उत्साह दिसून येत होता. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत नागरिकांनी ठेका धरला. शोभायात्रा सुरुवात होताच हिंदू तरुणांनी आमदार राम सातपुते यांना खांद्यावर घेत एकच जल्लोष केला. जय भवानी जय शिवराय, हर हर महादेव, भारतमाता की जय, जय श्रीराम अशा गगनभेदी घोषणा देण्यात येत होत्या. यावेळी आमदार राम सातपुते, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांची आरती करण्यात आली.

       दरम्यान, आमदार राम सातपुते म्हणाले, हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्यांना हिंदू समाज स्वीकारणार नाही. जो व्यक्ती, जो पक्ष हिंदुत्वासाठी कार्य करेल त्यालाच जनतेचे समर्थन राहणार आहे. हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या शोभायात्रेत सहभाग घेऊन भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

          चौकाचौकात आमदार राम सातपुते यांचे नागरिकांनी स्वागत केले. यावेळी आमदार सातपुते यांच्या समवेत छायाचित्र काढण्यासाठी भगवे फेटे, भगव्या टोप्या, भगवे शेले परिधान केलेल्या तरुणांनी मोठी गर्दी केली होती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)