चार्जिंग स्टेशनचे कामास सुरुवात- ग्राहक पंचायतीच्या प्रयत्नांना यश

0
 

           पंढरपूर (प्रतिनिधी) - राज्य परिवहन  मंडळाच्या  चार्जिंग स्टेशनचे रेंगाळलेले काम विभाग नियंत्रक यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ सुरू केले असल्याचे पंढरपूर आगार प्रमुख मोहन वाकळे यांनी सांगितल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली. 
पंढरपूर हे देशातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, राज्यातील सर्वात मोठे बस स्थानक आहे, लाखो भाविक या ठिकाणी प्रवास करतात. राज्यभरातील अनेक आगारातून इलेक्ट्रिक बस सेवा सुरु झाली आहे. मात्र हे महत्त्वाचे ठिकाण चार्जिंग स्टेशन नसल्याने ई बससेवेपासून वंचित होते. 
ही गरज लक्षात घेऊन येथील रेंगाळलेले चार्जिंग स्टेशन काम तातडीने सुरू करण्यात यावे म्हणून राज्य परिवहन महामंडळाकडे ग्राहक पंचायतीतर्फे पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेऊन  चंद्रभागा बसस्थानकात भूमीगत  केबल टाकणे, कंट्रोल रुम बांधणे, ट्रान्स्फाॅर्मर बसविण्यासाठी कट्टा बांधणे इ.कामे सुरू झाली आहेत.लवकरच हे काम पूर्ण करून ई बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत असेही आगार प्रमुख यांचेकडून सांगण्यात आले. 
याबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.
         पंढरपूर आगारातील चार्जिंग स्टेशनचे काम तातडीने पुर्ण होऊन प्रवाशांना इलेक्ट्रिक बसमधून प्रवास करता यावा अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा संघटक दीपक इरकल, सचिव सुहास निकते, तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये, संघटक महेश भोसले यांनी व्यक्त केली आहे.
          वेळोवेळी  "पंढरी संदेश" ने, स्थानिक वृत्तपत्रे व न्यूज पोर्टलने याबद्द्ल आवाज उठविला होता.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)