काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद
सोलापूर (प्रतिनिधी) - राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. याप्रसंगी महास्वामीजींनी भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी आशीर्वाद दिले.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोलापूरात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या. या दौऱ्यातील काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या भेटीप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महास्वामीजींचे आशीर्वाद घेऊन विविध अध्यात्मिक विषयांवर चर्चा केली. यावेळी महास्वामीजींनी ही भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी हे आम्हां सर्वांचे प्रेरणास्त्रोत आहेत. महास्वामीजींच्या आशीर्वादाने वेगळीच ऊर्जा मिळाली, अशी भावना यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना सर्वच घटकातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा विजय निश्चित आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.