पांडुरंग परिवारातील एकही कार्यकर्ता भाजप सोडून इतर पक्षाचे काम करणारा नाही - मा. आ. प्रशांतराव परिचारक

0
         करकंब (प्रतिनिधी) - इतर परिवारात  वेगवेगळ्या पक्षात काम करणारे कार्यकर्ते आहेत पण पांडुरंग परिवारातील एकही कार्यकर्ता भाजप सोडून इतर पक्षाचे काम करणारा नाही, पांडुरंग परिवारातील प्रत्येक कार्यकर्ता भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे असा विश्वास पांडुरंग परिवाराचे नेते मा. आ. प्रशांतराव परिचारक यांनी व्यक्त केला.
        करकंब येथे पांडुरंग परिवारातील कार्यकर्ता व पदाधिकारी यांची विचार विनमय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माढा लोकसभा भारतीय जनता पार्टी , शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस , रिपाई , रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर , मा आ प्रशांतराव परिचारक, भाजपचे चेतन केदार, बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड, उपसभापती राजाबापू गावडे, पांडुरंग कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास खुळे, तानाजी वाघमोडे, माऊली हळणवर, बाळासाहेब देशमुख, राहुल पुरवत, ज्ञानदेव कोरके, पांडुरंग व्यवहारे, बाबुराव जाधव आदीसह पांडुरंग परिवारातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
         माढा लोकसभा मतदारसंघातील पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक जिल्हा परिषद गटानुसार करकंब, पट कुरोली, भटुंबरे, सुपली आदी ठिकाणी ठेवण्यात आली होती, याप्रसंगी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांसोबत स्वतंत्र चर्चा करण्यात आली. गावाला खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेला निधी व केलेली विकास कामे याबाबत माहिती दिली तसेच गावातील  अडीअडचणी व विकासाच्या दृष्टीने राबवाव्या लागणाऱ्या धोरणावर चर्चा करण्यात आली.

--------------------------------------------------
       "क्या बडा, तो दम बडा"

आपण भाजप मध्ये प्रवेश केल्यापासून देवेंद्र फडणवीस यांनी आपणाला नेहमी मदत केली, अनेक कामे मार्गी लागली आहेत. काम करताना सर्वांना खूश ठेवता येत नाही, प्रत्येक वेळी आपल्या मनासारखे होत नाही म्हणून नाराज होऊ नका, क्या बडा तर दम बडा असे परिचारक यांनी सांगितले.
--------------------------------------------------

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)