विठ्ठल कारखान्याचे यशस्वी १०,८१,०११ मे.टन गाळप पूर्ण
पंढरपूर दि.१० (प्रतिनिधी) - श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२०२४ चा ४२ व्या गळीत हंगामात यशस्वी गाळप करून गळीत हंगामाचा सांगता समारंभ ह.भ.प.श्री रमेश महाराज वसेकर श्री संत सावता महाराज यांचे १६ वे वंशज श्रीक्षेत्र अरण व ह.भ.प.श्री देवव्रत (राणा) महाराज वासकर, पारंपारिक फडाचे जेष्ठ अधिकारी श्रीक्षेत्र पंढरपूर, श्री शिवतेजबाबा मोहिते-पाटील, श्री दादासाहेब साठे, श्री संजय कोकाटे, श्री शिवाजी कांबळे कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीतआबा पाटील व सर्व संचालक मंडळाचे यांचे प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे संचालक श्री बाळासाहेब चिंतामणी हाके व त्यांचे सुर्विद्य पत्नी सौ. सुवर्णा बाळासाहेब हाके या उभयतांचे शुभहस्ते श्री सत्यनारायण महापुजेने बुधवार दिनांक १०.०४.२०२४ रोजी संपन्न झाला...
गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी सभासद व ऊस पुरवठादार शेतकरी य तोडणी वाहतुक ठेकेदार यांना आवाहन करणेत आले होते की, जे जास्तीत जास्त ऊस पुरवठा करतील त्यांचा सन्मान करणेत येईल. त्यानुसार या गळीत हंगाम सांगता समारंभ प्रसंगी कारखान्यास या गळीत हंगामात सर्वात जास्त ऊस पुरवठा केलेले श्री सदाशिव यशवंत गाजरे रा.शेळवे, श्री सुनिल ज्ञानेश्वर मोरे रा. पटवर्धन कुरोली, श्री सुरेश मुरलीधर घाडगे रा. देगांव या तीन सभारादांचा सत्कार करण्यात आला. तसेच ऊस वाहतूक करणारे ठेकेदार श्री नितीन रघुनाथ शिंदे, श्री विष्णू भाऊसाहेब रुपनर, श्री नागनाथ ज्ञानोबा जाधव, अनिल उत्तम चव्हाण यांचा व एकरी १०० मे. टन उत्तारा मिळालेले शेतकरी श्री. रामचंद्र गोवर्धन देठे, हरीदास दशरथ कौलगे, अशोक एकनाथ भोसले या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल कारखान्याचे खातेप्रमुख यांचे अभिनंदन करून सन्मान करणेत आला.
सदर प्रसंगी कारखान्याचे चेअरमन श्री. अभिजीतआबा पाटील म्हणाले की, पंढरपूर तालुक्याचा वैभव व आर्थिक कणा असलेला श्री विठ्ठल कारखाना हा बंद अवस्थेत होता, या कारखान्याच्या आर्थिक व तांत्रिक परिस्थितीवर मात करून यशस्वीरित्या चालु करून दाखविला व सन २०२२-२०२३ गळीत हंगामामध्ये ७,२६,०१४ मे.टन ऊसाचे गाळप केले व सन २०२३-२४ गळीत हंगामामध्ये कमी कालावधीत यशस्वी गाळप करन १०,८१,०११ मे.टन ऊसाचे गाळप करून १०.३८ टक्के साखर उताराने १०,८५,०२५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. पुढील सिद्वानमध्ये जास्तीत जास्त गाळप करणेसाठी सर्वांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन केले.
सदर प्रसंगी ह.भ.प.रमेश महाराज वसेकर (श्री संत सावता महाराज यांचे १६ वे बंशज) श्रीक्षेत्र अरण हे बोलाताना म्हणाले की, गळीत हंगाम सांगता समारंभाचे कार्यक्रमास बोलवल्यामुळे सर्व संचालक मंडळाचा आभार आहे. कारखान्याची अशीच प्रगती व्हावी असे आशिर्वाद दिले.
या प्रसंगी आपल्या आध्यात्मिक शैलीत ह.भ.प.श्री देवव्रत (राणा) महाराज वासकर पारंपारिक फडाचे जेष्ठ अधिकारी श्रीक्षेत्र पंढरपूर हे बोलाताना म्हणाले की, श्री विठ्ठल कारखान्याला शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून संबोधले जाते, परंतु मागील काही काळात हा कारखाना बंद अवस्थेत होता हा बंद अवस्थेत असलेला कारखाना चालू करून मागील दोन गळीत हंगाम यशस्वीपणे गाळप केले आहे. त्यामुळे चेअरमन मा.श्री अभिजीत (आबा) पाटील हे या कारखान्यास मागील गतवैभव पुन्हा प्राप्त करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना शिवतेजबाबा मोहिते-पाटील म्हणाले, मागील काही काळात श्री विठ्ठल कारखाना बंद होता त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या ऊसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. सहकारातील एखादा कारखाना बंद पडला तर तो चालू करणे शक्य होत नाही. परंतु अभिजीत पाटील यांनी बंद पडलेला कारखाना चालू करुन या भागातील शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे. भविष्यात श्री विठ्ठल कारखान्यास नक्कीच चांगले दिवस येतील असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी दादासाहेब साठे, संजयबाबा कोकाटे, शिवाजी कांबळे, अॅड. बाळासाहेब पाटील, कारखान्याचे संचालक तुकाराम मस्के सर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड हे प्रास्ताविकपर भाषणात बोलताना म्हणाले की, गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये आपल्या सर्वाचे सामुहिक प्रयत्नामुळे कारखान्याने कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप केले. याबद्दल मी सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासद, बिगर सभासद उस पुरवठादार शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार, मजूर, हंगामी कंत्राटदार, तसेच खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी व कामगार, तथा गाल पुरवठादार व्यापारी व हितचिंतक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. मा. चेअरमन मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन ठरवेल ते उद्दिष्ट साध्य करणेसाठी आम्ही सदैव तत्पर राहू अशी ग्वाही मी सर्व खातेप्रमुख, कामगार व कर्मचारी यांचे वतीने देतो.
या कार्यक्रमाचे उप प्राचार्य श्री डोंगरे सर व नितीन पवार यांनी सूत्रसंचालन केले व कारखान्याचे माजी संचालक रायाप्पा हळणवर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, जनक भोराले, सचिन वाघाटे, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे, दशरथ जाधव, अशोक तोंडले, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, तानाजी बागल, सचिन शिंदे-पाटील, समाधान गाजरे, धनाजी खरात, उमेश मोरे, गणेश ननवरे तसेच माजी संचालक धोंडीबा वाघमारे, राजाराम सावंत तसेच मधुकर नाईकनवरे, भारतनाना पाटील, भाऊसाहेब महाडिक, कल्याणराव पाटील, नितीन कापसे, बलभिम लोंढे, सुभाषदादा भोसले, संदिप मांडवे, शिवाजीभाऊ पाटील, प्रथमेश पाटील, रमेश चोपडे, अॅड. योगेश रणदिवे, दिगंबर फाळके, किरण घोडके कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, व्यापारी, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, मजूर व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.